मारेगावात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांचे स्वागत
मारेगाव : प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांचे मारेगाव नगरीत आगमन झाले. मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने त्यांचे मारेगावात स्वागत करण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष मानकर वणी विधानसभा क्षेत्रात दौऱ्यावर जात असतांना मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज मंगळवारला भेट दिली.येथे मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना मानकर म्हणाले , काँग्रेस पक्ष बळकटीवर मी पुर्णतः भर देऊन जिल्हयात पक्षाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.माझ्या नियुक्तीची फलश्रुती निष्ठावान कार्यकर्त्यांना याही पेक्षा प्रतिष्ठा प्राप्त करण्यावर असेल.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार , नरेंद्र ठाकरे , वसंतराव आसुटकर , मारोती गौरकार,नंदेश्वर आसुटकर ,तुळशीराम कुमरे , मुन्ना कुरेशी , गजानन खापणे , आदींची उपस्थिती होती.