मारेगाव येथे रुग्णवाहिका लोकार्पण
🔸️आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते उद्घाटन
🔸️केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य
🔸️मारेगाव तालुक्यातील रुग्णांच्या ससेहोलपटाला पूर्णविराम
मारेगाव : प्रतिनिधी
केंद्रीय परिवहन मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मारेगाव येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज शुक्रवारला सकाळी पार पडला.
स्थानिक मार्डी चौकात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वरजी चिकटे होते.ज्येष्ठ नेते दिनकर पावडे , जिल्हा सरचिटणीस शंकरराव लालसरे , महामंत्री प्रशांत नांदे , शहर अध्यक्ष अनुप महाकुलकार, नगरसेवक वैभव पवार , रवी टोंगे , दुष्यंत निकम , ज्ञानेश्वर खामनकर, दत्तू लाडसे , गणपत हेपट यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मारेगाव येथील रुग्णालयात तोडक्या रुग्णवाहिका विहीत वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची कमालीची हेळसांड ही नित्याची बाब ठरत होती.हा संवेदनशील प्रश्न लोकप्रतिनिधी आमदार बोदकुरवार यांनी हेरून आज केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साध्य केला.या लोकाभिमुख रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
परिणामी , रुग्णवाहिका मारेगाव रुग्णालयाला उपलब्ध केल्याने रुग्णांच्या रेफर ससेहोलपटावर फुलस्टाप मिळाला आहे.