मार्डी रोडच्या जीवघेण्या खड्ड्याने रस्त्याची लागली वाट
🔸️दुचाकीस्वारांना मनक्याचे आजाराने ग्रासले
🔸️लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष चा आरोप
🔸️काँग्रेसचा आंदोलनाचा एल्गार
मारेगाव ते मार्डी या दहा कि.मी.अंतराच्या रोडची अक्षरशः चाळणी झाली असून मोठ्या खड्ड्याने दुचाकीस्वारांना आता कमरेचा त्रास जाणवू लागला आहे.मागील अनेक दिवसापासून वाट लागलेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे.सदर रस्त्यासाठी मारेगाव तालुका काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत आहे.
मारेगाव मार्डी हा नेहमीचाच दळणवळणा चा रस्ता असून तब्बल दहा किलोमीटर अंतर अक्षरशः भगदाड पडलेल्या अवस्थेत आहे.कुठे गिट्टी उखडली तर कुठे मोठे खड्डे त्यामुळे दुचाकीस्वारांना तर सोडाच पायदळ चालनेही दुरापास्त झाले आहेत.
खड्डे पडलेल्या रस्त्याने अनेक दुचाकीस्वारांना आता मणक्याचे त्रास जाणवू लागले.रस्त्यामुळे वेगवेगळ्या आजाराने दुचाकीस्वारांना घेरले असतांना लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून असल्याच्या संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान , मारेगाव तालुक्याचे स्थळ असतांना वेगवेगळ्या व प्रशासकीय कामकाजासाठी मार्डी परिसरातील जनता नियमित मारेगावचे उंबरठे झिजवत असते.मार्डी परिसरातील गावांचा संपर्क आणि नागरिकांची रीघ या रस्त्याने नित्याचीच बाब ठरते आहे. हा बहुचर्चित मार्डी रस्ता आता जनतेच्या जिवावर उठला आहे.टिप्पर , जड वाहतूकही या रस्त्याने भरधाव धावत असल्याने खड्ड्याची रोजची जबर भर पडत आहे.किंबहुना मार्डी रस्त्याने येजा करणे आता जीवघेणे ठरत असल्याने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासाठी मारेगाव तालुका कांग्रेस च्या वतीने खड्डेमय रस्त्यावरच आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांचे सह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.