विहिरीत आढळला विवाहित महिलेचा मृतदेह
🔸️वेगाव येथे हृदयद्रावक घटना
वेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वेगाव येथील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज बुधवारला सकाळी उघडकीस आली. या घटनेने वेगाव परिसरात शोककळा पसरली आहे . परिणामी , मारेगाव तालुक्यात सातत्याने घडत असलेल्या आत्महत्या प्रकरणाने तालुका पुरता प्रभावित झाला आहे.
मनीषा अनिल कोवे (३५) रा .वेगाव असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.मंगळवारच्या रात्री मनीषा ही घरून निघून गेली.कुटुंबातील लोकांनी रात्रभर शोधाशोध केली मात्र तिचा थांगपत्ता लागला नव्हता.आज बुधवारला सकाळी आठ वाजताचे दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या रामदास लांडे यांच्या शेतातील विहिरीत मानिषाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.
दरम्यान आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ठ आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.मृतक मानिषाच्या पश्चात पती व एक १५ वर्षीय मुलगी असून या हृदयद्रावक घटनेने वेगाव येथे शोककळा पसरली आली.