Type Here to Get Search Results !

बोटोणी सरपंच , सदस्य अपात्रतेला स्थगिती

 दिलासादायक...

बोटोणी सरपंच , सदस्य अपात्रतेला स्थगिती

🔸अप्पर आयुक्तांच्या न्यायालयाचा आदेश

मारेगाव : दीपक डोहणे 

तालुक्यातील बोटोणी येथील सरपंच व दोन सदस्य यांनी विहित वेळेत जातपडताळणी सादर केली नसल्याने कर्तव्याचा ठपका ठेवत तिघांना अपात्र घोषित करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती , मात्र या तिघांनी अमरावती अप्पर आयुक्तांच्या न्यायालयात धाव घेत अपात्रतेवर स्थगिती मिळविली.त्यामुळे विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

बोटोणी ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीता जुमनाके सह दोन ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा ठक व अश्विनी मडावी यांनी निवडून आल्यानंतर विहित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार येथील महादेव सिडांम यांनी केली होती.तक्रारीची गांभीर्याने दखल घेत येथील सरपंच व दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले.यानिर्णयाने राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली होती.

दरम्यान , अपिलार्थी सरपंच व दोन सदस्यांनी अप्पर आयुक्तांच्या न्यायालयात धाव घेतली.अपिलार्थी यांनी आव्हानित आदेशावर स्थगिती आदेश मिळविण्यासाठी तोंडी युक्तिवाद केला व तो ऐकूनही घेण्यात आला.जातपडताळणीची वस्तुस्थिती लक्षात घेता पुढील आदेशापावेतो अपात्रतेला स्थगिती देण्यात आली.या आदेशाने सरपंच सह दोन सदस्यांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी निवडणूक अधिनियमाच्या कर्तव्यातील कोडगेपणा व बेफिकिरी सरपंच आणि दोन सदस्यांच्या चांगलीच अंगलट आल्याच्या चर्चेने मारेगाव तालुका पुरता ढवळून निघाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies