मारेगाव तालुक्यात " तीन "पदाधिकाऱ्यांना नोटीस
🔸️अनुचित प्रकार घडू नये म्हणून मारेगाव पोलीस सतर्क
मारेगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अलटीमेटच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यातील तीन मनसे पदाधिकारी यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहे.
दरम्यान ,शांतता सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये , यासाठी राज्य शासनाकडून पोलिसांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न चिघळू नये यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
परिणामी , मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लक्ष केंद्रीत केले आहे.पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.तूर्तास मारेगाव तालुक्याची शांततेकडे वाटचाल सुरू आहे.