आश्चर्य अन दहशत.....
काटेरी फासात रहस्यमयरित्या रात्रभर बालिका..!
🔶वेगवेगळ्या तर्काला उधाण🔶पहापळ गाव रात्रभर हादरला
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे एका कुटुंबात सोमवार ९ मे रोजी लग्न विधीच्या पूर्व संध्येला हळदीचा कार्यक्रम सूरु होता.कार्यक्रमात सर्वच आप्तेष्ठी हजर असतांना सहा वर्षीय बालिकेला तिची आजी लगतच्या शेतात रात्री सात वाजताचे दरम्यान शौचास घेऊन गेली आणि आजी लग्न घरी परत आली.मात्र बालिका परतलीच नाही.ती रहस्यमयरित्या बेपत्ता झाली .या थरार प्रसंगाने सर्वच भेदरले. सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला.जवळपास २०० तरुण मोटारसायकल घेऊन सर्वत्र शोधाशोध करीत होते.सर्वजण बलिकेच्या अकाली बेपत्ताने भेदरलेल्या अवस्थेत चिंतेच्या सावटात सापडतात.वैऱ्याची रात्र वांझोटी ठरते आणि सर्वच मनाचा ठाव घेत स्तब्ध होतात.ती नेमकी गेली कुठे या चिंतेत सर्वच जागतात.
शोधमोहीम पुन्हा सकाळी पुन्हा सुरु होते.बेपत्ता झालेल्या ठिकाणच्या तब्बल एक कि.मी.अंतरावर असलेल्या एका शेतातील काटेरी फासात आत मध्ये आजी म्हणून तिचा आवाज येतो.फास काढताच अंगभर रुतलेल्या काट्याने रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या बालिकेस बाहेर काढतात अन सर्वच जन सुटकेचा श्वास सोडतात.
रात्री रहस्यमय रित्या ही बालिका कशी गायब झाली.नेमका हा प्रश्न अनुत्तरित असून या घटनेमुळे गावकऱ्यासह पोलिसही कमालीचे चक्रावून गेले आहे.या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली असून बालिकेचे शरीर काट्याने व्यापलेल्या अवस्थेत आहे. पुढील उपचारार्थ तिला जिल्हास्थळी पाठविण्यात आले आहे.