'त्या' चार आरोपींची कारागृहात रवानगी
🔸️एका आरोपीवर अतिरिक्त गुन्ह्याची वाढ
🔸️इंजेक्शन सह सात वस्तू जप्त
🔸️हत्येचे दोघे जन " मास्टरमाइंड "
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील डोर्ली येथील शेतकऱ्याच्या हत्येप्रकरणाचा उलगडा तब्बल चार दिवसानंतर झाला. गुन्ह्यातील चार आरोपी जेरबंद झाल्यानंतर या घटनेतील दोघांवर 'मास्टरमाइंड' चा ठपका ठेवण्यात आला.हत्येच्या सभोवतालच्या सात वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून चौघांची आज बुधवारला यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
आठ मे रोजी पशुधनास ठार मारण्याचे नियोजन मारेगाव येथील बिअरबार मध्ये करण्यात डोर्ली येथील विशाल झाडे याने रीतसर बैठक लावली.यात नवरगाव येथील अजित गैबिदास फुलझेले , प्रशांत भोजराज काटकर ,रुपेश शंकरराव नैताम सहभागी झाले.ठरल्याप्रमाणे नवरगावचे तिघे गुरांच्या गोठ्या नजीक गेले.विशाल झाडे हा पाळतीवर होता.मात्र जागल करणारा शेतकरी विलास गौरकार गोठ्याजवळ येताच झटापट होऊन तिघांनी त्याची हत्या केली.विशालने डोर्ली निवासी पोबारा केला.
दरम्यान , दुसऱ्या दिवशी भाऊ शेतात येताच भावाचा मृतदेहच दिसला आणि फिर्याद दाखल होताच विशाल अलगद अडकला.त्याच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड वरून तीन दिवसात छडा लागून नवरगावच्या तीन आरोपींची भर पडली.
चार आरोपीतील प्रशांत काटकर या आरोपीने स्वतःचे कपडे जाळून पुरावा नष्ठ केला त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला.आठवडाभर घुटमळत असलेल्या हत्येची विविधांगी चर्चेचे पडसाद तालुकाभर उमटत असतांना गंभीर घटनेचे "मास्टरमाइंड" म्हणुन विशाल झाडे व अजित फुलझेले यांची पोलीस दरबारी नोंद झाली.
मारेगाव पोलिसांनी अवघ्या दिवसात तपासाला गती देत इंजेक्शन,मोबाईल, गळा आवळणारा दुपट्टा,आरोपींचे कपडे , एल.ए. डी. बँटरी , चप्पल, मोटारसायकल आदी साहित्य जप्त केले.पोलीस कस्टडी रिमांड (पीसीआर) च्या आज शेवटच्या दिवसाला आरोपींना वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली.त्यानुसार चारही आरोपींची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
परिणामी , हत्येचा हकनाक व निर्दोष असलेला विलास गौरकार याचा बळी व सहा वर्षांपूर्वी विलासची अर्धांगिनी साथ सोडून गेल्याने त्यांचे दोन मुले मात्र मायबापाच्या सावलीला कायम पोरके झाले तर निर्दयतेचा कळस गाठणारे चार आरोपी जेलवारी करायला गेले.