"त्या" वृद्धाच्या वेदनादायी आर्त हाकेला मनसेचा ओ..!
🔸️मानसिक रुग्ण मुलाच्या नाहक त्रासातून सुटका
🔸️सामाजिक दायित्त्वाचे सर्व स्तरातून कौतुक
मारेगाव : दीपक डोहणे
ते दोघेही वृद्ध. दारिद्र्याचे चटके सोसत , भीक मागून पोटाची खळगी भरायची हा त्यांचा नित्यक्रम. अशातच मुलास मनोरुग्ण आजाराने पछाडले. हा त्याचा आजार मायबापाच्या जीवावर उठायचा.नेहमीची मारहाण या त्रागातून असह्य वेदना सहन होत नसल्याने त्यांनी थेट मनसे कडे धाव घेतली.सामाजिक दायित्वाची झालर बनलेल्या राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मारेगाव कार्यकर्त्यांना आदेश निर्गमित केला अन 'त्या' मानसिक रुग्ण मुलास स्वखर्चाने नागपुर रुग्णालयात भरती केले.वृद्ध दाम्पत्याची नाहक त्रासातून सुटका होऊन रुग्णांने उपचारास उदंड प्रतिसाद दिल्याने मनसेच्या या सामाजिक दायित्वाची सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील जगनराव व निर्मला कोकुडे हे वृद्ध दाम्पत्य.जगनराव यांची काही वर्षांपूर्वी दृष्ठी गेली. कालांतराने एकुलत्या एक मुलास मानसिक आजाराने पछाडले .त्यांच्यासमोर जगावे कसे हा यक्ष प्रश्न आ वासून उभा राहिला. दिवसागणिक दारिद्र्याचे चटके बसत असतांना दृष्ठीहीन नवऱ्याचा हात खांद्यावर घेऊन रुपया दोन रुपये गोळा करीत पोटाची खळगी भरू लागले.मात्र मुलगा मानसिक रुग्ण असतांना उपचाराची व्यवस्था नाही अशातच आजाराने पछाडलेला मुलगा या वृद्धास बेदम मारू लागला.पोटचा गोळा म्हणून या वेदना काही दिवस सहन झाल्या.मात्र असह्य वेदनेची परिसीमा ओलांडत असतांना ही वेदनादायी आपबिती त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे जवळ कथन केली.
सामाजिक दायित्वाची झालर पांघरलेल्या राजू उंबरकर यांनी आपणास समाजाचं काही देणं लागतंय या उदात्त हेतूने जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे व शहर अध्यक्ष चांद बहादे यांना आदेश निर्गमित करीत वास्तव चा अहवाल सादर करण्यास सांगितले.त्यांनी कुंभा गाठत कोकुडे यांची गंभीर परिस्थिती कथन केली.वेदनेचे सौहार्द ओळखून राजू उंबरकर यांनी नागपुरात संपर्क साधला.स्वतः जवळील आर्थिक मदत करीत मनोरुग्णास स्वखर्चाने शाखा प्रमुख वसंतराव घोटेकार यांनी थेट त्यास नागपुरात नेले.येथे त्या रुग्णावर उपचार सुरू असून इकडे वृद्ध दाम्पत्याची मारहाण व वेदनेतुन सुटका झाल्याने समाधानेची लकेर त्यांच्या चेहऱ्यावर उमटत आहे. मनसेच्या सामाजिक दायित्वाची चर्चा आणि कौतुक मारेगाव तालुक्यात घिरट्या घालत आहे.