निवड....
सगणापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी तोडासे , चिकटे उपाध्यक्ष
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सगणापूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी हनुमान तोडासे तर मारोती चिकटे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
सगणापूर आदिवासी सोसायटीच्या निवडणूकीत डाखरे गटाकडून शेतकरी परिवर्तन पॅनल व चिकटे गटाकडून शेतकरी विकास पॅनल यांनी ही निवडणूक चुरशीची बनविली होती. १३ संचालकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलला सहा तर विकास पॅनलला सात जागा प्राप्त झाल्या.
परिणामी आज झालेल्या मुख्य पदाच्या निवडीत शेतकरी विकास पॅनल चे हनुमान तोडासे व मारोती चिकटे यांची अनुक्रमे अध्यक्ष / उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.