नवरगाव चे तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
🔸️बैलाला मारण्याचे प्लॅनिंग मानसावर..
🔸️जुन्या वैमन्यस्यातून केले होते मारेगावात नियोजन
मारेगाव : दीपक डोहणे
जुने वैमन्यस्य असतांना तिघांनी शेतकऱ्याचा बैल मारण्याचे नियोजन मारेगावातील एका बार मध्ये केले.त्यानुसार तिघे शेतातील गोठ्यात जाऊन विषारी औषधीने बैल मारण्याचे इंजेक्शन देण्याचे मनसुबे असतांना जागली गेलेल्या विलास गौरकार नामक शेतकर्यांने आवाज दिला.आपले आता बिंग फुटते म्हणून तिघांनी मिळून विलासचा गळा आवळून खून केला.गेल्या सात दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे मुख्य तीन आरोपींचा मारेगाव पोलिसांनी छडा लावून अटक केली.
अजित गैबिदास फुलझेले (३९), प्रशांत भोजराज काटकर (३४), रुपेश शंकरराव नैताम (२९) सर्व रा. नवरगाव ता.मारेगाव असे गजाआड केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे , अटकेत असलेला विशाल झाडे व अजित फुलझेले यांची मारेगावच्या एका बिअरबार मध्ये भेट झाली.त्याच्या समवेत प्रशांत काटकर व रुपेश नैताम हेही हजर असतांना विशाल व फिर्यादी सतीश गौरकार यांचे जुन्या वैमणस्यातून सतिशचे गोठ्यातील बैल विषारी इंजेक्शन च्या साहाय्याने मारण्याचे प्लॅनिंग झाले.त्यानुसार अजित , प्रशांत व रुपेश हे डोर्ली शिवारातील गोठ्यात दि.८ मे रोजी रात्री गेले.गोठा उघडताच फिर्यादीचा भाऊ विलास गौरकार हा शेजारच्या शेतात जागली होता.तो गोठ्याजवळ येताच त्यांची आरोपीसोबत झटापट झाली.नशेत झिंगलेल्या अवस्थेतील आरोपींनी विलासला खाली पाडले.रुपेश हा विलासच्या अंगावर बसून अजित व प्रशांत यांनी दुपट्ट्याने विलास गौरकार याचा गळा आवळला व यातच विलासचा मृत्यू झाला.
तालुक्यात खळबळ उडवुन देणाऱ्या खुनाचे रहस्य उलगडण्यासाठी फिर्यादीच्या तक्रारीवरून घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संशायित विशाल झाडे यास अटक केली होती. मात्र ठोस धागेदोरे गवसत नव्हते .पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील जलदगतीने तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या सहा दिवसात हत्येचा उलगडा करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश पुंजलवार , ठाणेदार राजेश पुरी , उपनिरीक्षक डी. आर.सावंत यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद आलचेवार , नितीन खांदवे , रजनीकांत पाटील , विवेक राठोड , अफजल खान पठाण , अजय वाभीटकर यांनी रविवारच्या पहाटे छडा लावला.परिणामी आरोपी करायला गेले काय आणि वरती झाले पाय चा प्रत्यय या घटनेवरून आल्याची चर्चा गंभीरतेने रंगत आहे.