खळबळजनक....
वृद्धाचा मृतदेह देवाळा शिवारात आढळला
🔸️तर्कवितर्कला उधाण
मारेगाव:-प्रतिनिधी
तालुक्यातील देवाळा शिवारात एका वृद्ध इसमाचा मृतदेह आज मंगळवारला सकाळी आढल्याने खळबळ उडाली आहे.७५ वर्षीय इसमाच्या मृत्यूने वेगवेगळ्या तर्काला परिसरात उधाण आले आहे.
रामचंद्र लटारी निखाडे असे शिवारात मृतदेह आढळलेल्या वृद्धांचे नाव आहे.मृतकाचा मुलगा अंकुश निखाडे यांनी सोमवारला वडील बेपत्ता असल्याची मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.तत्पूर्वी नातेवाईक यांचे कडे वडीलाबाबत शहानिशा करण्यात आली मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नव्हता.
आज सकाळी रामचंद्र निखाडे यांचा मृतदेहच देवाळा शिवारात आढळल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान मृतक हा शेळ्या चारण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे.वृद्धाचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत अजून स्पष्टता नाही.मारेगाव पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहे.शवविच्छेदन अंती मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.