गोठ्याला आग , पाच लाखाचे नुकसान
🔸️कुंभा येथील घटना
कुंभा : प्रतिनिधी
तालुक्यातील कुंभा येथील शिवारात असलेल्या गोठ्याला आग लागून किमान पाच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.सदर आग आज सोमवारला दुपारी अडीच वाजताचे सुमारास लागल्याची घटना घडली.
आशिष बबनराव गोखरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.पिडीत शेतकऱ्याचे शेत कुंभा शिवारात आहे.येथे असलेल्या गोठ्यात गुरांचे वैरण सह शेतीपयोगी अवजारे आणि सिंचनाचे साहित्य होते.आज दुपारी अचानक गोठ्याला आग लागली व आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण गोठा कवेत घेतला.यात असलेले जवळपास पाच लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान आग नेमकी कशी लागली याबाबतची माहिती अजून स्पष्ठ नाही , मात्र शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी अशी मागणी आहे.