दिलासादायक...
पहापळ : पिडीत कुटुंबियांना मनसेचे उंबरकर यांची सांत्वना भेट
🔸️आर्थिक मदत प्रदान
🔸️बालिकेच्या उपचाराची मनसेंनी घेतली जबाबदारी
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात समाजमन सुन्न करून टाकणाऱ्या पहापळ येथील घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी रविवारला पिडीत कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेत आर्थिक मदत केली.यावेळी पिडीत बलिकेच्या वैद्यकीय उपचाराकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे उंबरकर यांनी सूतोवाच केले.
तालुक्यातील पहापळ येथे दि. ९ मे रोजी मारोती भेंडाळे नामक ३२ वर्षीय विकृत नराधमाने सहा वर्षीय कोवळ्या कळीवर अत्याचार करून निपचित अवस्थेत एक कि. मी.अंतर असलेल्या शेतातील काटेरी फासात टाकले होते.दुसऱ्या दिवसाला सकाळी तिला शुद्ध येताच एका शेतकऱ्यास तिचा आजी म्हणून आवाज आला.रक्तबंबाळ अन प्रचंड दहशतीत असलेल्या बालिकेला रुग्णालयात हलविले.उपचाराअंती नाराधमाचे बिंग फुटले.अवघ्या तासातच या विकृतास मारेगाव पोलिसांनी वडकी येथे बेड्या ठोकल्या.
दरम्यान , या दुर्देवी आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असतांना मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी यांनी तीव्र शब्दात निषेध करीत नराधमास फाशी शिक्षेसाठी आपण शासनाकडे प्रसिद्ध विधिज्ञ उज्वल निकम यांची निवड करण्याची मागणी करून सदर न्यायिक प्रकरण फास्टट्रॅक मध्ये चालविण्याची मागणी करणार असल्याची माहिती उंबरकर यांनी विदर्भ सर्च न्यूज नेटवर्क ला दिली.
यावेळी उंबरकर यांनी पिडीत कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान करून बालिकेच्या वैद्यकीय उपचाराची संपूर्ण जबाबदारी मनसे करेल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , आकाश खामनकर , शुभम पिंपळकर यांचेसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.