Type Here to Get Search Results !

जोपर्यंत माणसाच्या जीवनात वेधना शिल्लक आहे तोपर्यंत आंबेडकर थांबणार नाही - गीत घोष

जोपर्यंत माणसाच्या जीवनात वेधना शिल्लक आहे तोपर्यंत आंबेडकर थांबणार नाही - गीत घोष

वणी :- प्रतिनिधी 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रवर्तक गती असून ते नवयुग निर्माते आहेत, त्यामुळे त्यांचे विचारावर विषमतावादी ब्राम्हणी प्रवृतीने कितीही आघात करून त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला तरीही जगातील माणसाच्या जीवनात वेदना शिल्लक आहे तोपर्यंत ते त्यांना थांबवू शकणार नाही,असे प्रतिपादन प्रगतिशील साहित्यिक व विचारवंत गीत घोष यांनी दहेगांव येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य आयोजित व्याख्यानात अध्यक्ष पदावरून बोलत असतांना केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार प्रबोधन मंच दहेगांव च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंती निमित्य हे व्याख्यान आयोजीत केले होते, त्या निमीत्याने अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

या व्याख्यानमालेचे अध्यक्ष मा. गीत घोष होते तर, प्रमुख अतिथी म्हणून मा.माजी जी.प.सदस्य, दिलीप काकडे, ग्रामगीताचार्य विद्याताई, जुनगरी, वणी,राजेंद्र खोब्रागडे सर, मुकुटबन पो. स्टे .चे पोलीस निरीक्षक मा.अनिल सकवान साहेब, गणेश खाडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा प्रबोधन मंचाचे अध्यक्ष, डॉ.रामदास काटकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढे आपले विचार मांडतांना घोष म्हणाले की, विषमतावादी धर्मांध,जात्यांध सत्ताधारी पक्षाकडून या देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, बेरोजगार लोकाची दिशाभूल करून त्यांची फसवणूक केली जात आहे. जात आणि धर्माच्या नावावर या देशातील तरुणांची माथे भडकवून सामाजिक तेढ निर्माण केल्या जात आहे व त्यांचे लक्ष त्यांच्या समस्यापासून भटकविल्या जाते आहे. देशाला पुन्हा एकदा ब्राम्हणी व्यवस्थेचे गुलाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात असून देशाचे संविधान ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी देशातील दलित, शोषित, आदिवासी,सर्वहारा बहुजन लोकांनी आपली एकता मजबूत करुन देशाची सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी सज्य व्हावे असेही म्हणाले.

सायंकाळी ९ वाजता सामाजिक प्रबोधनपर गुनवंत पचारे सर याचा जाहिर किर्तनाचा आयोजीत करण्यात आला.

कारेक्रमाचे संचालन व प्रास्थावीक बाळू निखाडे यांनी केले तर आभार जगदीश बेसेकर यांनी माणले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies