बाबसाहेबांनी महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले - प्रतिक्षाताई गुरनूले
वणी :- प्रतिनिधी
पुरातन व मनुवादी व्यवस्थेने त्रीयांना खुप छळले त्यांचे समाजिक,आर्थिक, शैक्षिक व धार्मिक अधिकार काढून स्वातंत्र्य हिरावून घेतले होते अशा महिलांना बाबासाहेबांनी घटणात्मक अधिकार देवून सन्मानाचे जीने मिळवून दिले, असे उदगार प्रतिक्षा ताई गुरनूले हिने प्रमुख वक्ता म्हणून बोलत असतांना काढले.
घोन्सा येतील पंशिल महिला मंडळ व आंबेडकरी युवा उत्सव समीतीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव घेण्यात आला.
उदघाटन करतांना मा गीत घोष म्हणाले की डा.बाबासाहेब आंबेडकर यांची लढाई ही फक्त सत्ता मिळविण्यापुर्ति मर्यादित नव्हती तर विषमता व चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित ब्राम्हणी समाजव्यवस्था ध्वस्त करुन त्याठिकाणी समता, स्वातंत्र्य बंधूभाव व न्यायावर आधारित नव लोकशाही समाजव्यवस्था प्रस्थपित करण्यासाठी होती.
या कारेक्रमाचे ग्रामपंचायत सरपंच तथा घोन्सा गावचे प्रथमन नागरिक मंगेशजी मोहुर्ले हे होते, कारेक्रमाचे उदघाटन प्रगतिशील साहित्यिक व विचारवंत मा.गीत घोष यांनी केले, या कारेक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रतिक्षाताई गुरनूले, वैशाली पाटील, प्रवीण वनकर, ललीताई वनकर, आनंद पाटिल, नलिनीताई,यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून मा. पोलीस पाटील सचिनजी उपरे, विजय जीवने, गुनवंत मुन हे मंचावर उपस्थित होते. कारेक्रमाचे प्रस्थाविक यशवंतराव रामटे सर यांनी केले, संचालन गजानन बेसर यांनी केले,तर आभार विश्रांत ताकसांडे यांनी मानले.
हा प्रोग्राम यशस्वी करण्याकरीता युवा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रणव जीवने, भिमराव तेलंग,हर्षल मून,शेषराज ताकसांडे,मारोती रामटेके,सुमित बारसागळे,चित्तरंजन कांबळे,सौ.मंगला बेसरकर, सुनिता बारसागळे,अरुणा रामटेके,दिपाली कांबळे,पपीता जीवने,मंगला घोष, ताई मुन, कविता ताकसांडे,संध्या तेलंग,वैशाली रमटेके, गयाबाई पथाडे, तारा तेलंग,बबीता रामटेके आदिंनी परिश्रम घेतले.