Type Here to Get Search Results !

मारेगाव वि.का.स.संस्था निवडणूक...

मारेगाव वि.का.स.संस्था निवडणूक...

शेतकरी एकता पॅनलचे पारडे जड

🔸एक हाती सत्ता घेण्यासाठी प्रचारात आघाडी

संग्रहित फोटो

मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील समितीच्या सदस्यांची निवडणूक येत्या रविवारला १७ एप्रिल रोजी होत आहे.संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असतांना यात दोन पॅनल आमने सामने आहे.मात्र निवडणूक जशी जशी जवळ येत असतांना शेतकरी एकता पॅनलचे पारडे जड होतांना दिसत आहे.

मारेगाव विविध विविध कार्यकारी सहकारी संस्था स्थापनेपासून काँग्रेस समर्थीत पॅनलचे या संस्थेवर वर्चस्व आहे.यंदाच्या निवडणुकीत शेतकरी एकता विकास पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल यांच्यात लढत आहे.आजतागायत तालुक्यातील सहकारी संस्थेवर काँग्रेस समर्थीत पॅनलचा वरचष्मा राहीला आहे.त्यामुळे यंदाही संस्थेवर मुसंडी मारण्याचे जोरकस प्रयत्न चालविल्या जात आहे.त्यासाठी शेतकऱ्यांसाठी पॅनल कसे हिताचे यासाठी मतदारांना डोअर टू डोअर भेट देत कार्यकार्ये भूमिका विषद करून सांगत आहे.

मारेगाव विविध कार्यकारी संस्थेत कर्जदार सभासद मतदार १४७५ आहे.यात मारेगाव , करणवाडी , खडकी , टाकरखेडा , डोर्ली ,कोलगाव , मांगरुळ , गौराळा , नेत , वरुड , आकापूर , सोमनाळा , निंबाळा , बोदाड , भांदेवाडा येथील मतदारांचा समावेश आहे.प्रतिष्ठेची बनलेल्या निवडणुकीत शेतकरी एकता पॅनल कडून कर्जदार मतदार संघातून शशिकांत बोढे , विश्वजित गारघाटे , यादवराव काळे , रामदास कुचनकार , जांबुवंत खंगार , संजय पोटे , पांडुरंग रोगे , शेख हबीब शेख इस्माईल महिला मतदार संघातून रजनीताई शामराव बोढालें , सुधाताई उद्धवराव महाकुलकर इतर मागास प्रवर्ग मतदार संघातूनपांडुरंग अवताडे अनुसुचित जाती जमाती मतदार संघातूनअनिल भाऊराव कोडापे तर विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार संघातूनविठ्ठल धर्माजी काळे हे ट्रक या बोधचिन्हावर नशीब आजमावत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies