वेदनादायी...
मारेगावात बालिकेचा अकाली मृत्यू
🔸सर्वत्र हळहळ
मारेगाव : प्रतिनिधी
येथील प्रभाग क्रमांक १६ मधील चिमुकलीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सामिया दुष्यंत वानखेडे (१२) असे अकाली मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
सामिया हिला बुधवारला दुपारी बारा वाजताचे दरम्यान अचानक ताप आला. तिला घोंसा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र रात्री तिला अचानक ओकारी आणि हगवण सुरू झाली.याच दरम्यान तिच्या शरीरावर काळपट डाग येऊ लागले.सकाळी नऊ वाजता ग्रामीण रुग्णालयात नेले असता ओपीडी सुरू नसल्याचे प्रशासनाने अकलेचे तारे तोडले.उपचारास वेळ असल्याने पालकाने घरी आणून दहा वाजता परत रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत बराच विलंब झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
दरम्यान प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे बालिकेचा अचानक मृत्यू झाल्याची ओरड आहे.बलिकेच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मन हेलावून टाकणाऱ्या या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.