सिंधी महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी बंडू डाहुले
मारेगाव तालुक्यांतील (सिंधी )महागाव ग्राम विकास संस्था रजिस्टर नंबर 883 च्या अध्यक्षपदी बंडू डाहुले यांची नुकतीच निवड करण्यात आली.(सिंधी) महागाव ग्राम विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. मात्र अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत आला आहे. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित गजानन खापणे गटाचे बंडू डाहुले यांना सात मते पडली सर ुसर्या गटाचे विनोद चहानकर यांना सहा मते पडली पडली. त्यामुळे निवडणूक अधिकारी संतोष नैताम यांनी बंडू डाहुले यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी बाळा गाडगे तर सदस्यपदी गजानन खापणे, गणपत ढवस, विनोद ठावरी, सुधाकर बल्की ,विलास नेहारे यांची निवड घोषित केले