Type Here to Get Search Results !

मारेगाव आठवडी बाजारातून सोने लंपास करणारा चोरटा यवतमाळात गजाआड

मारेगाव आठवडी बाजारातून सोने लंपास करणारा चोरटा यवतमाळात गजाआड

🔸सात महिन्यापूर्वी मारेगाव येथील महिलेच्या गळ्यातून सोने केले होते लंपास

मारेगाव :प्रतिनिधी
मागील सात महिन्यांपूर्वी मारेगाव आठवडी बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोने शिताफीने काढून पोबारा करणाऱ्या सराईत चोरट्यास तब्बल सात महिन्यानंतर पोलिसांना पकडण्यात यश आले.सराईत चोरट्यास यवतमाळ येथे अटक करण्यात आली आहे.

मारेगाव आठवडी बाजार करणारी मारेगाव येथील महिला साधना नंदकिशोर देऊळकर हिच्या गळ्यातील साडेबारा ग्रॅंम ची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने शिताफीने लंपास केले होते.काही वेळातच ही बाब पिडीत महिलेच्या लक्षात येताच पोलीसात तक्रार दाखल केली.  

दरम्यान सदरील प्रकरणाचा तपास  सुरू असतांना एल.सी.बी.ला अज्ञात चोरट्या बाबत गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार सदर चोरटा हा तब्बल १२० ग्रँम सोने लगड करून यवतमाळ येथे विकण्यासाठी जात असतांना पोलिसांनी रंगेहात पकडून आरोपी जय शिवा सकट (२८) रा. नेताजी नगर यवतमाळ यास अटक केली.अटकेत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी सोने चोरी केल्याची कबुली दिली .यात मारेगावचाही समावेश आहे. 

दरम्यान मारेगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्या असतांना चोरटा गजाआड झाल्याने पिडितांना चोरी गेलेले आभूषणे परत मिळेल अशा अपेक्षा व्यक्त होत आहे. पुढील तपास एस.डी. पी.ओ. संजय पुल्लजवार , ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात बीट जमादार आनंद आचलेवार , नितीन खांदवे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies