Type Here to Get Search Results !

बोटोणीतील सरपंचासह दोन सदस्य अपात्र

खळबळजनक...

बोटोणीतील सरपंचासह दोन सदस्य अपात्र

🔸जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवले 
🔸अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश निर्गमित

मारेगाव : प्रतिनिधी
वर्ष भरापूर्वी झालेल्या बोटोणी ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील सरपंच सह दोन सदस्यांना अपात्रतेची टांगती तलवार उभी ठाकली आहे.अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निर्गमित आदेशाने मारेगाव तालुक्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मारेगाव तालुक्यातील बोटोणी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक सन २०२० मध्ये पार पडली.या निवडणुकीत सुनीता जुमनाके ,सुवर्णा ठक , अश्विनी मडावी हे सदस्य म्हणून निवडून आले.नव्हेतर गावातील प्रथम नागरिक म्हणून सुनीता विनायक जुमनाके ह्या सरपंचपदी विराजमान झाल्या.

दरम्यान या तिन्ही सदस्यांनी वर्षभरात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार येथील महादेव सिडांम यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली.त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तिघांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय निर्गमित केला.या निर्णयाने बोटोणी सह राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
  
न्यायालयात दाद मागू
       मध्यंतरी कोविड ने सर्वसामान्य जनतेची झालेली परवड , एसटीचा संप यामुळे जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यात अडसर निर्माण झाला.अशातच अपात्र संदर्भात कुठली नोटीस आपणास यापूर्वी प्राप्त झाले नाही.त्यामुळे अपात्र च्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू.
        सुनीता जुमनाके
         सरपंच
        ग्रामपंचायत , बोटोणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies