पत्रकार कैलास ठेंगणे यांचेवर रानडूकाराचा हल्ला
🔸शेतात जात असतांना राज्य महामार्गावरील घटना
🔸सायंकाळी हाताची शस्त्रक्रिया , वणी येथे उपचाराकरिता दाखल
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील दै. सकाळचे बातमीदार तथा विदर्भ सर्च न्यूज नेटवर्कचे उपसंपादक कैलास नथ्थूजी ठेंगणे यांच्या धावत्या दुचाकीवर रानडुकराने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारला सकाळी दहा वाजताचे सुमारास राज्यमहामार्गावर घडली.कैलास ठेंगणे हे आज सकाळी कुंभा स्थित शेतात मोपेड स्कुटीने जात असतांना राज्यमहामार्गावर करणवाडी मारेगाव च्या मधात झुडपातून सैरावैरा आलेल्या रानडुकराने थेट वाहनावरील कैलास यास जबर हल्ला चढविला. काही कळण्यापूर्वी घडलेल्या घटनेने कैलास हे खाली कोसळले.या घटनेत त्यांना हात , पायांना जबर इजा झाली.तात्काळ त्यांना प्राथमिक उपचारानंतर वणी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.डॉक्टरांनी त्यांना हाताची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून त्यांचेवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
दरम्यान , रानडुकर हल्ला व जखमी प्रकरणी वनविभाग प्रशासनास तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ आर्थिक मदत प्रदान करण्याची मागणी पिडीताने केली आहे.