ग्रा.पं. सदस्यांच्या पतीने हाणली ग्रामसेवकाच्या कानशिलात
🔸️महिला सदस्यांनेही दिली ग्रामसेवकाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार
🔸️महिला सदस्यांच्या पती विरोधात सचिवांची तक्रार
🔸️चिंचमंडळ ग्रा.पं. येथील प्रकार
मारेगाव : प्रतिनिधी
चिंचमंडळ येथे मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मासिक सभेचा वेळ निघून गेल्यानंतर सरपंच व एक महिला सदस्य हजर झाले. महिला सदस्यांनी पाणी प्रश्न व यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे बोलण्यात आले.मात्र यावर समाधान झाले नसल्याने महिला सदस्यचे पती सचिवास भेटण्यास गेले यावेळी दोघात शाब्दिक खडाजंगी होत महिला सदस्यांच्या पतीने थेट सचिवांच्या कानशिलात मारल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली .एका महिला सदस्यांनीही ही ग्रा मसेवका विरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केल्याने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.ही घटना आज दि.२९एप्रिल चे दुपारी १ वाजताचे दरम्यान घडली.
शुक्रवारला चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते.या सभेकरिता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते.
दरम्यान या मासिक सभेकरिता ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री दिवाकर सातपुते या पतीसह उपस्थित झाल्या.यावेळेस जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रे आणि अलीकडेच गावातील पेटत असलेला पाणी प्रश्नांवर शाब्दिक खडाजंगी होत मारहानीचा प्रकार घडला.या संदर्भात शासकीय कामात अडथळा करित महिला सदस्याचे पती दिवाकर नामदेव सातपुते यांनी मारहार केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी पोलिसात तक्रार दिली.तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने बोलून विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली. वृत्त लिही पर्यंत तपास सुरु असून कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.