कुंभा येथे विवाहित युवकाची आत्महत्या
येथील तीस वर्षीय विवाहित युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना 21 एप्रिल रोजी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली.
मारोती जगन कोकुडे, वय: ३०वर्ष, रा. कुंभा असे मृतकाचे नाव आहे. आज तो दिवस भर घरी होता. त्याला भूक लागल्याने त्याने आईला बिस्किट पुडा आणण्याकरिता दुकानात पाठविले. यादरम्यान त्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आई बिस्कीट घेऊन घरी येताच सदरची घटना उघडकीस आली. त्याच्यामागे अंध आई, वडील ,पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. वृत्त लीहोस्तर पोलीस दाखल व्हायचे होते.