निवडणूकनामा....
शिवणी ग्राम.वि.का.स.संस्था अविरोध
🔸अशोक धोबे , पांडुरंग लोहे , शशिकला काटवले, काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या व्युव्हरचनेने अविरोध सत्ता
🔸निलेश रासेकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शिवणी धोबे येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची सार्वत्रिक निवडणूक अविरोध झाली. येथील निवडक प्रतिष्ठित नागरिक तथा मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या व्युव्हरचनेने ही निवडणूक अविरोध करण्यास यश प्राप्त झाले.
सहकारी संस्था म्हणून मारेगाव तालुक्यातील सोसायटी निवडणुकीचा ज्वर वाढला आहे.तालुक्यातील शिवणी येथे सुरुवातीला दोन पॅनल आमने सामने येऊन या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचे संकेत होते.मात्र माजी सरपंच अशोक धोबे , पांडुरंग लोहे , सरपंच शशिकला काटवले व मारोती गौरकार यांनी दोन्ही पॅनल च्या पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन ही सोसायटी अविरोध करण्यावर भर देत शिक्कामोर्तब केला.
राजकीय समयसूचकता जोपासत ही निवडणूक अखेर अविरोध झाली.यात अशोक धोबे , कल्पना संजय धोबे , सुधीर धोबे , दौलत बदखल , अजय धोबे , पद्माकर धाबेकर , प्रवीण लोहे , रमेश बदखल ,प्रेमीला ढोके , विनोद धोबे , वाल्मिक मेश्राम , निलेश रासेकर यांची संचालक पदी निवड झाली. सर्व संचालकांची निवड होताच जल्लोष करण्यात आला.दरम्यान , निलेश नामदेव रासेकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अविरोध झालेल्या संचालकांनी आपल्या निवडीचे श्रेय पद्माकर धोबे, मधुकर धोबे,पांडुरंग जांभुळकर,शंकर धोबे,कृष्णा धोबे,नामदेव ढोके , नथ्थू ढोके,जनार्धन टेनपे , रमेश ढोके यांना दिले.एस.बी.इंगोले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.