खळबळजनक....
रोहित्र आगीच्या कवेत
🔸️पांढरकवडा (लहान)येथील घटना
🔸️ वीज विभाग , ग्रा.पं. सदस्याचा बेतालपणा कारणीभूत
🔸️मूलभूत गरजेवर संकट
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पांढरकवडा ( पिसगाव ) येथील रोहित्राला आज गुरुवारला सकाळी आठ वाजताचे दरम्यान अचानक आग लागल्याने येथील वीज पुरवठा व पाणी पुरवठा ऐरणीवर आला आहे.विद्युत विभाग व ग्रामपंचायत सदस्याच्या कमालीच्या दुर्लक्षाने रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.
पांढरकवडा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेले रोहित्राला आज सकाळी अचानक आग लागली.रोहित्राला केरकचर्यांनी विळखा घातला आहे.उन्हाळ्याचे दिवस त्यातच तापमानात प्रचंड वाढ होत असतांना सभोवतालचा केरकचरा साफ करण्याचे सौजन्यही दाखवण्याची कुचराई ग्रा.पं. सदस्य कडून होत आहे.परिणामी वीज विभाग कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान रोहित्राला शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले असून तूर्तास वीजेचा पुरवठा व पाणी पुरवठ्यावर संकट ओढावले आहे.तात्काळ रोहित्र दुरूस्ती करून मूलभूत गरज पूर्ण करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.