Type Here to Get Search Results !

चिंचमंडळ ग्रामसेवका विरोधात विनयभंगाचा तर ग्रा.पं. सदस्यांच्या पती विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल

चिंचमंडळ ग्रामसेवका विरोधात विनयभंगाचा तर ग्रा.पं. सदस्यांच्या पती विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल

मारेगाव : प्रतिनिधी
चिंचमंडळ येथे मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मासिक सभेचा वेळ निघून गेल्यानंतर सरपंच व एक महिला सदस्य हजर झाले. महिला सदस्यांनी पाणी प्रश्न व यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे जाब विचारण्यात आला.मात्र यावर समाधान झाले नसल्याने महिला सदस्यचे पती सचिवास भेटण्यास गेले यावेळी दोघात शाब्दिक खडाजंगी होत महिला सदस्यांच्या पतीने थेट सचिवांच्या कानशिलात मारल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली .एका महिला सदस्यांनीही ही ग्रामसेवका विरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केल्याने ग्रामसेवक खरात यांचेवर विनयभंगाचा तर शासकीय कामात अडथळा निर्माण व अनु.जाती / जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत सातपुते यांचेवर मारेगाव पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेने चिंचमंडळ ग्राम पुन्हा बहुचर्चेत आला आहे.

शुक्रवारला चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते.या सभेकरिता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते.मात्र विहित वेळेतील ग्रामसभा सदस्यांच्या अनुपस्थिने झाली नाही.

दरम्यान या मासिक सभेकरिता ग्रामपंचायत सदस्य उशीरा भाग्यश्री दिवाकर सातपुते या पतीसह उपस्थित झाल्या.यावेळेस ग्रा.पं. सदस्या भाग्यश्री सातपुते यांनी जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रे आणि अलीकडेच गावातील पेटत असलेला पाणी प्रश्नांवर शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळेस सदस्य सातपुते यांचे पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करित  मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी पोलिसात तक्रार दिली.तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने हात पकडत  विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.

तक्रारीनुसार ग्रामसेवक किशोर खरात यांचेवर विनयभंगाचा तर दिवाकर सातपुते यांचेवर शासकीय कामात अडथळा आणि अनु .जाती / जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत मारेगाव पोलिसात शुक्रवारला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार , ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies