Type Here to Get Search Results !

पाठराखण करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची तात्काळ हकालपट्टी करा

गर्भित इशारा....

पाठराखण करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांची तात्काळ हकालपट्टी करा

🔸️कारवाई होईस्तोवर पोषण आहार घेणार नाही 
 🔸️ बालकांना केंद्रात पाठवणार नसल्याचा पालकांचा एल्गार
🔸️ मांगली येथील पोषण आहार अपहार प्रकरण पुन्हा ऐरणीवर
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मांगली येथील पोषण आहार अपहार प्रकरणाचा तपास थंडयाबस्त्यात असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची संबंधित विभागाकडून पाठराखण करण्यात येत आहे. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मांगली येथील पालकांनी केली आहे.कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन व बालकांना केंद्रात न पाठविण्याचा पालकांनी एल्गार पुकारला आहे.

तालुक्यातील मांगली अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनीस हे आपल्या कर्तव्यात कमालीचा कसूर करीत चक्क बालकांचा आहारच आपल्या घशात भरत असल्याची तक्रार मागील पाच महिन्यांपूर्वी येथील पालकांनी केली होती.मात्र तक्रारींवर ठोस पावले उचलण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असून त्यांची केवळ पाठराखण करण्याचे मनसुबे असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येतो आहे.सदर तक्रार जिव्हारी लागल्याने येथील दोन युवकाविरोधात सेविकेने चक्क पोलिसात तक्रार दाखल करून पारदर्शकतेचा आव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान पाच महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाईसाठी चालढकलपना सुरू आहे.मागील अनेक दिवसांपासून पोषण आहारात दोघींच्या संगनमताने घोळ व शिल्लक आहार घरी नेल्याची कबुली दिली असतांना कारवाई का होत नाही की जाणीवपूर्वक पाठराखण सुरू आहे याबाबत प्रशासनच आता शंकेच्या व वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

परिणामी वारंवार पोषण आहार गडप करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, कारवाई होईस्तोवर बालकांचा पोषण आहार घेणार नाही व बालकांना केंद्रातही पाठविणार नसल्याचा एल्गार दिलीप आत्राम , मोरेश्वर डुकरे , भालचंद्र मेश्राम , अनिता नागोसे , राजू नागोसे, शरद गजबे, सुषमा जीवतोडे, लीना डुकरे , सुभाष आत्राम , प्रतिभा आत्राम , मंगला मत्ते , सुनीता आडे , मनीषा आडे , अमोल जीवतोडे ,सुरज मत्ते , अनिल मोहिते , मोरेश्वर आडे, सुजित डुकरे , नथ्थू डुकरे या नागरिक / पालकांनी पुकारला आहे.

         
पालकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेवुन चौकशी करण्यात आली.सदर प्रकरणाची सुनावणी सुद्धा ठेवण्यात आली होती मात्र पालकांचा प्रतिसाद मिळाला नाही.किंबहुना प्रकरणाची चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.दोष / सदोष व त्यावरील कारवाईचा निर्णय जिल्हा पातळीवर घेण्यात येतात.
         
           जया मोरे
बाल विकास प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय , मारेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies