ऑटो अपघातातील एकाचा मृत्यू
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव येथून प्रवासी घेऊन निघालेला ऑटो खडकी पुलासमोर राज्यमहामार्गाच्या कडेला पलटी झाल्याने चार जन जखमी झाल्याची घटना आज बुधवारला सकाळी साडेनऊ वाजताचे दरम्यान घडली.यातील एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
लग्न समारंभा करीता घोगुलदरा येथे प्रवासी ऑटोने जात असतांना ऑटो चालक भुपेश वाटगुरे याचे वाहनावरून नियंत्रण सुटून ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.या अपघातात मारेगाव येथील चालक वाटगुरे (४०)सह आदिती राऊत (९) कळंब , मधुकर लसवंते (६५)रा.पुलगाव व मयंक नेहारे ( २ वर्ष ) रा. मारेगाव हे जखमी झाले.जखमीतील दोघांना गंभीर इजा पोहचली असून पुढील उपचारार्थ वणी येथे हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान मधुकर लसवंते यांचा मृत्यू झाला.
दरम्यान , ऑटो चालकास झोपेची कळ लागल्याने सदर अपघात झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्याच्या बेताल चालविण्याने प्रवाशांनी वारंवार थांबविण्यासाठी सूचना केली होती मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या चालकाचा वाहनावरून ताबा सुटला आणि अपघात एकाच्या जीवावर बेतला.