गोठ्याला आग , शेतीचे साहित्य खाक
🔸लाखोंचे नुकसान
🔸वनोजा येथील घटना
🔸वनोजा येथील घटना
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वनोजा येथे गोठ्याला आग लागून किमान लाख रुपयांचे शेती साहित्य खाक झाल्याची घटना रविवारला घडली.
सुधाकर नारायणराव धांडे असे आगीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वनोजा देवी शिवारात असलेल्या शेतातील गोठ्याला रविवारला दुपारी अचानक आग लागली.यात शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले.किमान एक लाख रुपयांचे साहित्य जळाल्याने पिडीत शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आहे.दरम्यान आग नेमकी कशी लागली याबाबत अनभिज्ञता आहे.