महात्मा ज्योतीबा फुले हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहेत. -प्रतिक्षाताई गुरनूले
क्रांतीबा ज्योतीबा फुले याचा संघर्ष हा भट्ट ब्राम्हणशाहीच्या बहूजन विरोधी कुटिल व षडयंत्रकारी ब्राम्हणी नीती विरोधी होता हे लक्षात घेऊन आपण बहुजनांनी महात्मा फूलेंना डोक्यावर घेऊन न नाचता आपल्या डोक्यात घ्यावे असे उदगार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य घोन्सा ईथे आयोजित व्याख्यानात बोलताना महाराष्ट्राच्या ख्यातनाम वक्ता प्रतिक्षा गुरनूले यांनी काढले
अ.भा.माळी महासंघ युवा मंडळ घोन्सा च्या वतीने क्रांतीबा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्य या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानाच्या त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.या व्याख्यानाचे अध्यक्ष अ.भा.माळी महासंघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ गुरनूले हे होते, उदघाटन राजेंद्र मांडाळे जिल्हा संघटक यांनी केले
तर प्रमुख वक्ता म्हणून प्रतिक्षाताई गुरनूले या होत्या. तसेच प्रमुख पाहुने म्हणून मा.विजय जिवने, उपसरपंच ग्रा.पं.घोन्सा, महेश उराडे माजी पं.स.सदस्य, वणी, गीत घोष, प्रा.यशवंतराव रामटेक, रमेश वाढई,गोपाल चाटारे, गणेश चहारे, बाबाराव शेंडे, अक्षय मोहुर्ले,रामभाऊ मोहुर्ले,हे व्याख्यान मंचावर उपस्थित होते. गुरनूले ताई पुढे बोलतांना म्हणाल्या की, अलीकडे भोंग्यावर हनुमान चालीसा वाचून या देशातील सौदार्याचे व एकतेचे वातावरण बिघडवण्याचे काही राजकीय लोकांचे कटकारस्थान चालू आहे,हिंदूत्वाच्या नावावर आपल्या बहुजन तरुनांचे माथी भडकविण्याचे राजकारण ब्राम्हणवादी लोक करतांना दिसत आहे, याला आपल्या लोकांनी बडी पडू नये असे आवहान सर्वांना त्यांनी केले. आपण जर महात्मा ज्योतीबा फुले यांचे वारस असू तर सर्व महापुषाचे विचार अंगीकारुन पुढे गेले पाहिजे अस्याही त्या म्हणाल्या ।
प्रथम महात्मा ज्योतीबा फुले यांचे जयंती निमित्य घोन्सा गावातून बहुजन मिरवणूक काढण्यात आली. बहुजन सारा एक है, देशकी जनता नेक है । जय ज्योती, जय क्रांती । हमारे देशमें जातपात के कोई झगड़े, नहीं चलेंगें नहीं चलेंगे असे लोक एकतेचे नारे देण्यात आले.
या व्याख्यानाचे प्रास्थावीक पांडूरंग चौधरी यांनी केले, संचालन, सुशील निकोडे यांनी तर,आभार, घोन्सा ग्रामपंचायत चे सरपंच व घोन्सा गावचे प्रथम नागरिक मंगेशजी मोहुर्ले यांनी केले.