Type Here to Get Search Results !

सत्ता ही सपुर्ण व्यवस्था परिवर्तनाचे क्रांतिकारी हत्यार आहे. -गीत घोष

सत्ता ही सपुर्ण व्यवस्था परिवर्तनाचे क्रांतिकारी हत्यार आहे. -गीत घोष



वणी :- प्रतिनिधी 
आधुनिक भांडवलदारी धर्मांध जात्यांध पध्दतीचा अटळ व निकट विनाश जाहीर करणे हे महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे महान व ऐतिहासिक कार्य असून सत्ता ही संपुर्ण व्यवस्था परिवर्तनाचे क्रांतिकारी हत्यार आहे आणि त्यासाठी ही सत्ता दलित, आदिवासी, शोषित, बहुजन सर्वहारा समुहाच्या हाती असली पाहिजे असे परिवर्तनकारी मत महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी व्यक्त केले.

ते शेतकरी मंदिर वणीच्या सभा हाल मध्ये आयोजित महाराष्ट्र ट्रायबल आघाडी सभेच्या अध्यक्ष पदावरून आघाडिच्या कर्यकर्त्यांना संबोधित करीत असतांना बोलत होते.

वणीतील शेतकरी मंदिराच्या सभा हालमध्ये महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक सभा आयोजित केली होती. या सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष हे होते तर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. प्रा.गणेश मागाडे सर,वणी, अँड. अरविंद सिडाम, राजूर(काँ),चंद्रपुर जि. ट्रायबल आघाडीचे अध्यक्ष, बबन पेंदोर यांनी देखिल सभेला संबोधित केले.

पुढे बोलताना घंटे घोष म्हणाले की, स्वातंत्र्यपुर्व काळत आपल्या देशाची सत्ता ही धर्मांध,जात्यांध पुरोहितशाहीच्या अधिकारात होती, परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने भारतीय संविधानाचा स्विकार करुन ही सत्ता लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्षतेवर आधारलेली असेल असे अभिवचन भारतीय लोकांना दिल्या गेले आहे. मात्रा आजूनही भारतीय लोकांनी संविधानिक मुल्यावर आधारित लोक सत्ता स्थापित नकरता पुन्हा भांवलदारी जात्यांध धर्मांध राज्यकर्त्यांच्या हातात सोपविली असल्याने हा देश, गरीबी, बेकारी,बेरोजगारी, भुकमरीच्या संकटात सापडलेला आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर ही सत्ता शोषणकर्त्या सत्ताधिशाच्याहातून कष्टकरी, शोषित, वर्गाचे हातत घ्यावी लागेल तरच या देशाच्या स्वातंत्र्याला खरे भविष्य असेल असेही ते शेवटी म्हणाले.

सभेचे प्रास्थावीक महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. संतोषजी भादिकर यांनी केले व त्यातून त्यांनी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे भविष्यकालीन धोरणाची मांडणी केली.या सभेचे सुत्रसंचालन सुधाम गावंडे यांनी केले तर आभार पुरुषोत्तम सोयाम यांनी मानले.

सभा यशश्वी करण्यासाठी संतोष चांदेकर, बळवंतराव पंधरे,प्रदीप जुमनाके,भगवान आत्राम, संतोष आत्राम, अमोल कुमरे, सचिन मेश्राम, रमेश मडावी, संजय मेश्राम आदिंनी परिश्रम घेतले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies