Samsung Galaxy F४२ ५G स्मार्टफोन, मिळणार स्पशेल डिस्काउंट
सॅमसंगने आपला नवीन 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy F42 5G ला भारतात लाँच केले आहे. दोन व्हेरिएंटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोनव कंपनी ३ हजार रुपये स्पशेल डिस्काउंट देत आहे.
🔴Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन लाँच.
🔴रुपये स्पशेल डिस्काउंट.
🔴६४ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप.
Samsung ने भारतात आपला नवीन ५जी स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने एफ सीरिजमधील पहिला ५जी स्मार्टफोन Samsung Galaxy F42 5G ला सादर केले आहे. फोनमध्ये नाइट मोडसह ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. फोन १२ बँड ५जी सपोर्ट करतो. फोनला मॅट ब्लॅक आणि मॅट एक्वा या २ रंगात सादर केले आहे.
या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट आहे सर्व रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता.
Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर दिला आहे. पॉवरसाठी १५ वॉट यूएसबी टाइप सी फास्ट चार्जर सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा ५जी स्मार्टफोन १२ बँड्स सपोर्ट करतो.
६४ मेगापिक्सल कॅमेरा
फोनमध्ये ६४ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात नाइट मोड मिळेल. रियरला ५ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्राइड ११ आधारित One UI ३.१ वर काम करतो.
IMAGE | PRODUCT | DETAILS | ||
---|---|---|---|---|
Galaxy F42 5G |
Galaxy F42 5G
![]() |
Samsung Galaxy F42 5G |
|
Check On-Buy Now |