निंभा येथील ग्रामस्थांना सेवा योजनेच्या शिबिरातून शैक्षणिक , बौद्धिक , प्रबोधन , मनोरंजनात्मक मेजवानी
🔸दिग्रस येथील बीएनबी महाविद्यालयाचा उपक्रम🔸असंख्य मान्यवरांनी लावली हजेरी
🔸विद्यार्थ्यांद्वारे गावात श्रमदान व जनजागृती
दिग्रस :-शारिक शेख
दिग्रस येथील बा.बू. कला ना.भ.वाणिज्य व बा.पा. विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दत्तक ग्राम निंभा येथे नुकतेच साप्ताहिक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आरोग्य , मनोरंजन , प्रबोधन , शैक्षणिक , बौद्धिक , सांस्कृतिक , शैक्षणिक उपक्रम घेऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली . असंख्य मान्यवरांनी शिबिराला भेटी देऊन सर्व उपक्रमांची प्रशंसा केली .
निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ. संतोष जयस्वाल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले . अध्यक्षस्थानी डी. व्ही. एस. पी. मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग होते . सरपंच माया अशोक पवार , पोलीस पाटील अशोकराव खटारे , प्राचार्य कॅप्टन विनोद खळतकर , गिरीश फरीदखाने , ताईबाई राठोड , रंजना परसावळे , अशोकजी पवार , सुभाष लोखंडे , मुख्याध्यापक मुहम्मद सादिक व ग्रा.पं. सदस्य आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रवीण चांडक यांनी प्रास्ताविक केले . विद्यार्थ्यांनी महिला बचत गटाच्या मदतीने ग्रामस्वच्छतेचे महत्व पथनाट्य , घोषवाक्य व दवंडीद्वारे ग्रामस्थांना पटवून दिले .
संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड क्रिटीकल केयर सेंटरच्या साह्याने आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप शिबीर घेण्यात आले . जवळपास तीनशे लोकांना याचा फायदा घेतला . नेत्र तज्ञ डॉ अभय पाटील , डॉ संदीप दुधे , डॉ. प्रशांत रोकडे , आशिष शेजपाल , स्त्री रोग तज्ञ डॉ. कल्पना जाधव , बालरोग तज्ञ डॉ. निलेश जाधव , आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ डॉ . श्रीकृष्ण पाटील , दंतरोग तज्ञ डॉ संदीप जाधव यांची निशुल्क सेवा मिळाली. दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पंकज वानखडे , सोनाली काळे व इतर चमुंद्वारे ९० लोकांची रक्त तपासणी करण्यात आली . तसेच महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाद्वारे जवळपास १३२ ग्रामस्थांची रक्तगट तपासणी डॉ. नीता लाभसेटवार , डॉ. संजीवनी पराते , डॉ. नरेंद्र मनवर सर व विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला . तालुका आरोग्य अधिकारी कृष्णदास बानोत यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १४ वयोगटाच्या बालकांकरिता कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे औषधी वनस्पती छायाचित्र प्रदर्शनी व माहिती शिबिराचे आयोजन विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद ढोरे , प्रा. प्रणव गडकर यांनी केले होते . व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प. मधुकर खोडे महाराज यांच्या उपस्थितीत ग्राम स्वच्छता अभियां व प्रवचन घेण्यात आले . व्यक्तिमत्त्व व बौद्धिक सत्रामध्ये "आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतीय संविधानाच्या जनजागृती करिता "घर- घर संविधान गांव -गांव संविधान मन- मन संविधान" या विषयावर प्रा. डॉ. ए. डी. जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . प्रा. डॉ. संजय देवस्थळे अध्यक्षस्थानी होते . "आरोग्य , ग्रामविकास व स्वच्छता" या विषयावर प्रा. डॉ रुपेश कऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले . प्रा. डॉ. आर आर वानखडे अध्यक्षस्थानी होते .
बचत गटाच्या महिलांचा मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमात जिवोन्नती अभियानाचे तालुका व्यवस्थापक नरेंद्र राठोड मार्गदर्शक होते . सी. आर. पी. महिला बचत गटाच्या माधुरी अशोक लोखंडे अध्यक्षस्थानी होत्या . एडस विषयी जनजागृती शिबिरात आय. सी. टी. सी.चे समुपदेशक पंकज वानखडे प्रमुख वक्ते तर अध्यक्षस्थानी अशोक पवार होते . विधी तज्ञडॉ के. जी. देशपांडे यानी "महिला विषयक कायद्यांची माहिती" दिली . प्रा. डॉ.सौ. अपर्णा पाटील अध्यक्षस्थानी होत्या . ग्राहक प्रबोधन शिबिरात तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष मतीन खान यांनी मार्गदर्शन केले . अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. अपर्णा पाटील , तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ व्ही.के. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले . शिबिरादरम्यान क्षेत्रीय समन्वयक रा. से. यो. प्रा. डॉ. विवेक सिरस्कार व इतर मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले .
राष्ट्रीय सेवा योजनेचा यवतमाळ जिल्हा कोरोना योद्धा पुरस्कार बहाल झाल्याबद्दल कु.काजल संजय दुर्गे हिचा सत्कार करण्यात आला . दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ प्रदीप मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला . सरपंच माया अशोक पवार , प्राचार्य कॅप्टन विनोद खळतकर , पोलीस पाटील अशोकराव खटारे , अशोकजी पवार , जानूसिंग चव्हाण , सुमनताई चव्हाण , सुभाष लोखंडे , कु. काजल दुर्गे आदी प्रमुख पाहुणे होते . प्रास्ताविक प्रा. रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण चांडक यांनी केले . सूत्रसंचालन धम्मपाल दंदे तर आभार प्रदर्शन ऋषिकेश गावंडे यांनी केले .
सदर सात दिवसीय शिबिराच्या यशस्वितेसाठी निंभाचे प्रतिष्ठित नागरिक अशोक पवार , कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रवीण चांडक , महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. कु. प्रियंवदा भट , डॉ मनोज भगत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी , बबलू पटेल ,अमोल कवचट , प्रेमानंद पवार , रा.से. यो. चे विद्यार्थी ऋषिकेश गावंडे , सोनू शेख , वैभव राठोड , नरेश जाधव , राज राठोड , सुरज आडे , मुस्कान नौरंगाबादे , संदेश कांबळे , प्रणित गावंडे , प्रतिक इंगोले , अवंतिका हिरास , पूजा बोरेकर , चैताली पठाडे ,अभिजीत राठोड आदींनी अथक परिश्रम घेतले .