सात क्विंटल चना वर हात साफ
🔸पाथरी येथील घटना🔸४५ हजाराचे शेतकऱ्याचे नुकसान
🔸मारेगाव तालुक्यात चोरीच्या प्रमाणात वाढ.
तालुक्यातील पाथरी शिवारातील एका शेतात पोते भरलेला सात क्विंटल चना अज्ञात चोरट्यांनी बुधवारच्या पहाटे लंपास केल्याची घटना घडली . चोरटे थेट चारचाकी वाहनाने डल्ला मारत असल्याने मारेगाव तालुक्यात शेत मालाच्या चोरीचे प्रमाणात कमालीची वाढ झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे सावट आहे.
पाथरी येथील शेतकरी वसंतराव मुसळे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील चना मंगळवारला उशिरा मशीनच्या सहाय्याने काढण्यात आला.शेतातच रात्र झाल्याने जवळपास ४५ हजार रुपये किमतीचे सात क्विंटल चना पोते भरून शेतात ठेवला आणि घरी गेले.
दरम्यान अज्ञात चोरट्यांनी थेट चारचाकी वाहन लावून पोते भरलेला चना चोरून नेल्याची घटना शेतातील टायरच्या निशाण्यावरून निदर्शनास आली.दरम्यान शेतातील शेतमाल चोरणारे चोरटे हे परिसरातीलच असल्याचा कयास व्यक्त होत आहे.
तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून शेतमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना घडल्या असतांना हे चोरटे पकडण्यास पोलिसांना अजूनही यश आले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड दहशत आहे.परिणामी हातात आलेले उत्पादन चोरट्यांचा घशात जात असल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीस येत आहे.