साईबाबा संघाने मारली बाजी
🔸श्रीरामपूर येथील कबड्डी सामने
मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथे क्रांतिवीर शामा दादा कोलाम क्रीडा मंडळातर्फे कबड्डीचे सामने चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अरुण खंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, गजानन कीन्हेकर, माजी उपसभापती गजानन खापणे, माजी सरपंच विजय घोटेकर आदी मंचावर उपस्थित होते.
या दिवस-रात्र सामन्यांमध्ये प्रथम बक्षीस साईबाबा सघ करंजी यांनी पटकाविले . तर द्वितीय पारितोषिक बोरी संघ, तृतीय पारितोषिक गौराई संघ, तर चतुर्थ पारितोषिक क्रांतिवीर शाम दादा कोलाम संघ श्रीरामपूर यांनी पटकाविले .
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कुंभा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष देवाची गोहाने, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले, राजेंद्र मांदाडे ,अनिल राऊत , श्रीकृष्ण सोनुले, उपसरपंच रामभाऊ मेश्राम, बंडू चौधरी ,अमृत मेश्राम, केशव मेश्राम, नारायण सुरपाम ,महादेव आत्राम ,विलास टेकाम ,गजानन रामपुरे ,देविदास मेश्राम,यशपाल आत्राम, राजू शेगावकर सह आदी मंचावर उपस्थित होते. या सामन्याच्या यशस्वितेकरिता क्रांतिवीर शाम दादा कोलाम क्रीडा मंडळ व गावकरी यांनी प्रयत्न केले.