Type Here to Get Search Results !

वाळू तस्करांनी केला नाल्यांचा बोगदा

खळबळजनक...

वाळू तस्करांनी केला नाल्यांचा बोगदा

🔸 रॉयल्टीवर 'मॅजिक पेन' चे रहस्य
🔸मर्यादेपेक्षा अधिक ब्रासची वाहतूक
🔸प्रशासनापुढे ठेवले तस्करांनी तगडे आव्हान
मारेगाव : दीपक डोहणे
प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत तब्बल वीस तस्करांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने अवैध रेती घाट निर्माण केल्यानंतर कोसारा , चिंचमंडळ , दापोरा परिसरात नाल्यातील वाळू उपसा करीत अक्षरशः नाल्याला बोगद्याच्या स्वरूप प्राप्त झाले आहे.तस्करांनी मांडलेल्या या दिवसरात्र खेळात नेमके कुणाचे अभय ? हा खरा प्रश्न निर्माण होत आहे.
मागील अनेक महिन्यापासून चिंचमंडळ , कोसारा परिसरातील वाळू तस्करांनी उंच्छाद मांडला आहे.करोडो रुपयांची वाळू तस्करी करीत आता वरोरा तालुक्यातील तस्करांना हाताशी पकडत चक्क स्वयंमघोषीत अवैद्य वाळू घाट निर्माण करून लाखो रुपयांचा मलिंदा लाटला तर करोडो रुपयांचा महसूल बुडीत टाकला.मात्र यावर प्रशासनाने अजूनही ठोस पावले उचलले नसल्याने गुपीत आच्छर्य व्यक्त होत आहे. वाळू तस्करांवर कुणाची मेहेरनजर आहे हा प्रश्न विशेष चर्चिल्या जात आहे.

मॅजिक पेनचे रहस्य अन प्रशासनाची दिशाभूल
वणी उपविभागात काही रेती घाट लिलाव करण्यात आले.महसूल प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या रॉयल्टीवर मॅजिक पेन चा खुलेआम वापर केल्या जात आहे.रॉयल्टीवर खोडतोड करून उष्णता दिल्यास रॉयल्टीवरील शाई नाहीशी होते त्यावर रॉयल्टीची तारीख व वेळ कोरी होते.आपल्या मताने तारीख व वेळ नमूद करीत वाळूची वारेमाप वाहतूक केल्या जात असल्याचा फंडा राजरोसपणे सुरू असल्याची विश्वसनीय माहीत प्राप्त झाली आहे.त्यामुळेच मॅजिक पेंन चे रहस्य उलगडले असतांना प्रशासनाची दिशाभूल सुरू आहे.

मारेगाव तालुक्यात नाल्यांचे झाले बोगदे
मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांनी नदीत वेगळा घाट तयार केल्यानंतर आजूबाजूला असलेल्या नाल्यातून प्रचंड प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे.ही वाळू रात्री बेरात्री कँनलचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आल्याची माहिती आहे.वाळू तस्करावर नियंत्रण ठेवणारे कर्मचाऱ्यांचे वाळू सारखे मऊ हात ओले तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे मारेगाव तालुक्यातील नाल्यांची पार ऐशीतैशी करीत नाल्यांचे बोगदे तयार झाले आहे.आता जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून करोडो रुपयांचा महसूल बुडीत काढणाऱ्या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळून कायदेशीर कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies