Type Here to Get Search Results !

वेगाव येथे विदर्भ स्तरीय कबड्डीचे सामने

वेगाव येथे विदर्भ स्तरीय कबड्डीचे सामने 


🔷जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब वेगाव द्वारे आयोजित
🔷भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

वेगाव :- राज पीपराडे
कबड्डीची साठी प्रसिध्द असलेल्या वेगाव येथे जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब द्वारे दि १०,११ व १२ मार्चला भव्य खुले कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले आहे .यात ५१,०१६/- रुपयांचे प्रथम बक्षीस देण्यात येणार असून प्रवेश शुल्क १,०१६ रुपये ठेवण्यात आला आहे .या मध्ये पुरुष व महिला असे  दोन गट असतील पुरुषांना प्रवेश शुल्क १,०१६ रुपये ठेवण्यात आला आहे तर महिला करिता ७१६ प्रवेश शुल्क आहे.सदर सामन्यात  पुरुषकरिता अमर्याद संघ या प्रमाणे संघांना प्रवेश देण्यात येणार आहे . प्रथम बक्षीस ५१,०१६ रुपये , द्वितीय ३१०१६/- , तृतीय २१०१६ /- , तर चतुर्थ बक्षीस १००१६ /- ठेवण्यात आले आहे .वैयक्तिक बक्षिसे पुरुष संघ    बेस्ट रेडर :-  मॅट शूज जयचंद ढोके यांचेकडून, बेस्ट डिफेंडर :- आशिष गजबे यांच्याकडून रोख रक्कम, मॅन ऑफ द मॅच :- रोख रक्कम भारत कालेकार यांचेकडून 
वैयक्तिक बक्षिसे महिला संघ   बेस्ट रेडर :- रोख रक्कम सुंदर हिंगाणे यांचे कडून, बेस्ट डिफेंडर :- रोख रक्कम  जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब वेगाव यांचेकडून, मॅन ऑफ द मॅच:-  रोख रक्कम जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब वेगाव यांचेकडून


वेगाव खुले पटांगण येथे हे सामने होणार असून उद्घाटक म्हणून मा.श्री हंसराज जी  अहिर माजी केंद्रीय  गृहराज्यमंत्री तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री संजय देरकर, प्रमुख अतिथी मा.श्री तारेंद्र बोर्डे मा.श्री अनिल देरकर, मा.श्री रमण डोये  मा.श्री  द्यानेश्वर चिकटे ,मा.सौ. माला गौरकर, मा .श्री.जयंत फुलझेले, मा .श्री डॉ. कोडापे,वसंतराव काकडे, सुभाष चिकटे, अरुण निमसटकर, गोविंदा निखाडे,विशाल किन्हेकर, द्यानेश्वर किंगरे, द्यानेश्वर वरारकर, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील .


तसेच दिनांक १०/०३/२०२२ ला सकाळी नऊ वाजता  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब वेगाव व केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन मारेगाव यांच्या द्वारे करण्यात आले आहे
मा.श्री. बाळूभाऊ धानोरकर खासदार यांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल .तर मा.श्री वामनराव जी  कासावार माजी आमदार, मा.श्री.टिकारामजी कोंगरे मा.श्री.नरेंद्र पाटील ठाकरे, श्री गजाजन किन्हेकर श्री रमण डोये,इजहार शेख,सौ मालताई गौरकर,दामोदर वाटेकर,पंढरी काकडे, मधुकर टोंगे , राजू बोकडे, वामन गौरकर, मारोती डोये ,भास्कर वेले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे .

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहे . विस्तृत माहिती , नियम व अटी जाणून घेण्यासाठी किंवा सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक 9689831807--7709561445--9284555565--8380879944--9822598016किंवा 9767921682 यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies