द बर्निंग टेम्पो
🔸धावत्या टेम्पोला लागली आग
🔸कँबिन खाक , जीवितहानी टळली
🔸पोलिसांच्या सतर्कतेने आग विझविण्यात यश
मारेगाव : दीपक डोहणे
राज्यमहामार्गावरील खडकी फाटा नजीक धावत्या टेम्पोला अचानक आग लागून समोरील कँबिन जळून खाक झाल्याची घटना बुधवारला सकाळी अकरा वाजताचे दरम्यान घडली.सदर घटनेत जिवीतहानी टळली असून मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले.
प्राप्त माहितीनुसार टेम्पो क्रमांक हे वाहन वणी येथून यवतमाळकडे जात असतांना राज्यमहामार्गावरील खडकी फाटा नजीक अचानक धावत्या वाहनाने पेट घेतला.आग लागताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला घेत वाहनातून बाहेर पडला.आणि पाहता पाहता टेम्पोचा समोरील भाग आगीने कवेत घेतला.
मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई नितीन खांदवे व पोलीस वाहन चालक अतुल हिवरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी तात्काळ पोलीस वाहन व अँटो मधून थेट बोटोणी येथून डबकी च्या साहाय्याने पाणी आणून आगीववर नियंत्रण मिळविले आणि टेम्पोचा मागील भाग शाबूत ठेवण्यावर यश मिळविले.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.