अमरावती झोन अध्यक्ष पदी श्री डी. एच. बिहाडे यांची एकमताने निवड
विद्युत क्षेत्र अमरावती झोनच्या अध्यक्षपदी मारेगाव आदिवासी बहुल तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे डी.एच.बिहाडे यांची निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीने जनसामान्य कर्मचारी तथा संघटनेच्या प्रलंबीत प्रश्नांचे व न्याय हक्काचे दालन निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे .बिहाडे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन १०२९ ची व्हिडिओ कॉन्फरन्स चे माध्यमातून सभा सोमवारला संपन्न झाली. त्यामधे पदाधिकारी आणि सभासद यांनी,सामाजिक कार्य, संघटन कौशल्य,तांत्रिक सभासद यांच्या मदतीला धावणारा , प्रसंगी कामगारांच्या न्याय्य हक्काकरिता प्रशासन सोबत लढणारा या कार्याची दखल घेत आणि त्यांचेवर अतूट विश्वास ठेवत श्री डी एच बिहाड़े यांची अमरावती झोन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
या निवड़ी चे श्रेय केंद्रीय सरचिटणीस आर. टी .देवकांत ,केंद्रीय अध्यक्ष रविदादा बारई यांचेसह केंद्रीय , प्रादेशिक, अमरावती झोन पदाधिकारी तमाम तांत्रिक सभासदा ला देत त्यांचे आभार मानण्यात आले. बिहाडे यांच्या निवडीचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.