कलगाव उर्दू शाळेने साकारले पुस्तकांचे 'तरंगते' वाचनालय!
शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन.
बाल वाचकांसाठी विविध पुस्तकांची मेजवानी.
दिग्रस : प्रतिनिधीपुस्तकांची संख्या आणि आकाराने वाचनालय छोटं असलं तरी ते मुलांमध्ये मोठा वैचारिक बदल घडवू शकते असा विश्वास शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. ते येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आयोजित बाल वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. वाचनातूनच विद्यार्थी घडतात असा आपला अनुभव असून पुस्तकातून मुलांची वैचारिक जडणघडण होत असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. दिग्रस पंचायत समितीच्या सभापती अनिता राठोड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद सदस्य हितेश राठोड, पंचायत समिती सदस्या दिपाली लाखाडे, उर्दू भाषा तज्ज्ञ डॉ. याह्या नशीत, गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, सरपंच अस्मिता मनवर, उपसरपंच अलीमोद्दीन, दिवाकर राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निजाम कारी यावेळी मंचावर उपस्थित होते. शाळेने तयार केलेल्या आकर्षक लोगोचे विमोचन शिक्षणाधिकारी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मिर्झा नासिर बेग यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निजाम कारी, अ. मतीन अ. मजीद, मुकेश कोंडावार, दिवाकर राठोड, जि प सदस्य हितेश राठोड, डॉ. याह्या नशीत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक मुल विशेष असून त्याच्यातील गुण ओळखून त्या गुणांचा विकास घडवून आणण्याचे दायित्व शिक्षकांचे असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. मुलांनी तयार केलेल्या हस्तकला साहित्य खोलीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या विविध वस्तूंची पाहणी करून मुलांच्या कलागुणांचे कौतुक आपल्या भाषणातून केले.
| IMAGE | PRODUCT | DETAILS | ||
|---|---|---|---|---|
| Samsung Galaxy M12 (6GB RAM, 128GB Storage) |
Samsung Galaxy M12 (6GB RAM, 128GB Storage)
|
Samsung Galaxy M12 |
|
Check On Amazon |
शाळेने साकारलेल्या चिल्डरेन्स लायब्ररीमध्ये उर्दू, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून मुलांना अवांतर वाचनासाठी ती दिली जाणार आहेत. या वाचनालयाचे व्यवस्थापन शाळेतील मुली करणार आहेत, हे विशेष! मुलांच्या आवाक्यात असलेली पुस्तकांची विशेष व आकर्षक रचना हे या बाल वाचनालयाचे वैशिष्ट्य आहे. अवघे वाचनालय तरंगते असून बाल वाचकांना पुस्तक ठळकपणे दिसतील व घेता येतील अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना येथे पहिल्यांदाच पाहायला मिळाली. यावेळी मुलांनी वाचलेल्या पुस्तकांचे थोडक्यात सादरीकरण केले. मुलांची दर्जेदार प्रस्तुती पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला केंद्र प्रमुख किरण बारशे, गिरीश दुधे, शाहीद इकबाल, अझमत खान, नाज़ीमोद्दीन शेख, बब्बू भाई, वसीमोद्दीन, एजाज़ोद्दीन, खुर्शीद भाई, सादिक शेख, सैय्यद गफ्फार, जावेद शेख, सागर गुजर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य फारुक अहमद, इमरान कुरेशी, म. एजाज़, अकरम खान, मौलवी अ. मोबीन, मझहरोद्दीन, अ. मतीन, शिक्षणा फाउंडेशनचे सिध्दांत तुपसुंदरे, शिक्षक, पालक, विद्यार्थी व गावकरी मोठया संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अताऊर रहेमान यांनी तर आभार महंमद परसुवाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमीन नवरंगाबादे, फरीदा फरहीन, समीना परवीन, आरेफुन्नीसा यांनी परिश्रम घेतले.