Type Here to Get Search Results !

अपक्ष नगरसेवक आसुटकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

बॅक टू पॅव्हेलियन...

अपक्ष नगरसेवक आसुटकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

🔸डिजिटल नोंदणीला प्रारंभ

मारेगाव : दीपक डोहणे
नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल करून बंडखोरी करीत विजय संपादन करणाऱ्या नंदेश्वर आसुटकर यांनी घरवापसी करीत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारला काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मारेगाव काँग्रेस कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार वामनराव कासावार अध्यक्षस्थानी होते.जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर ,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार , गजानन किन्हेकार , मुन्नाभाई कुरेशी , आशिष कुळसंगे , ओम ठाकूर , नानाजी डाखरे , गणुजी थेरे , यादवराव पांडे , रमण डोये , अंकुश माफुर , अरविंद वखनोर , विनोद आत्राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

IMAGE PRODUCT DETAILS
Samsung Galaxy M12 (6GB RAM, 128GB Storage) Samsung Galaxy M12 (6GB RAM, 128GB Storage) Samsung Galaxy M12
  • LIMITED:LOOT OFFER
  • RAM:6GB
  • ROM:128GB
  • Battery Power:6000MAH
  • Operating System:Android 11
  • Camera:48+5+2+2
Check On Amazon
नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग तीन मध्ये नंदेश्वर आसुटकर यांनी बंडखोरी करित विजय संपादन केला होता.सदर निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेला काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. काँग्रेस ने नगराध्यक्ष पदासाठी थेट ' बंडखोर' उमेदवार दिल्याने नगरसेवकात प्रचंड धुसफूस होती आणि ऐन वेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन नगरसेवकांनी घुमजाव करीत काँग्रेसला सत्तेपासून कोसो दूर ठेवले. काँग्रेसनेही घोडचूक करीत इतर नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याची गरळ ओकण्यात आली.

दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने दामाचा पूर्णपणे उपयोग करीत असतांना सम्राटाचे स्वप्न हवेत विरले आणि सेना भाजप ने अलगद सत्ता खिशात घातली.याच अपक्ष नगरसेवकाने उशीरा का होईना म्हणत आज घरवापसी केली.परिणामी आजपासून काँग्रेस पक्षाकडून डिजिटल प्रवेशाची सुरुवात करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies