Type Here to Get Search Results !

पुतनी चतुर्भुज होण्याच्या पूर्वसंध्येला नियतीने रचला काका वर डाव

वेदनादायी....

पुतनी चतुर्भुज होण्याच्या पूर्वसंध्येला नियतीने रचला काका वर डाव

 🔸चिंचमंडळ येथील मुख्याध्यापक अशोक जवादे यांचा अपघातात मृत्यू
🔸आनंदावर विरजण अन हळहळ



मारेगाव : दीपक डोहणे
घरात पाहुण्यांची रेलचेल.शुभकार्य असल्याने सर्वच कामात मग्न व तेवढाच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतांना उद्याच्या नवरीला हळदी ची जय्यत तयारी सुरू होती.तेवढ्यात एक अघटीत घटनेचा निरोप येतो व सर्वच स्तब्ध होतात.पुतणी उद्या चतुर्भुज होईल याकार्यासाठी काका दुचाकीने येत असतांना टिप्परची धडक बसते. आणि लग्न घरी नीरव शांतता पसरते.हा धीरगंभीर प्रसंग घडला बुधवारला सायंकाळच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ खैरी रस्त्यावर ! या अपघातात मारेगाव पंचायत समिती अंतर्गत चिंचमंडळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक श्रीधर जवादे यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.

सविस्तर असे की , चिंचमंडळ शाळेचे मुख्याध्यापक अशोक जवादे हे बुधवार दि.०९ ला सायंकाळी आपले सहकारी शिक्षक चापले यांचे समवेत दुचाकीने खैरी येथे गेले.खैरी वरून पुतणीचे लग्नकार्य असलेल्या दापोरा येथे एकटेच परत येत असतांना समोरून येत असलेल्या वाळू भरलेल्या टिप्पर ने जबर धडक दिली.यात जवादे हे गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेने पुरते हादरलेल्या कुटुंबासह आप्तेष्ठी मनाने सैरभैर झाले.जवादे यांची गंभीर अवस्था पाहून वधू मंडपी नीरव शांतता पसरली. सर्वांच्या मनाने ठाव घेतलेल्या घटनेने शुभ प्रसंगी मनाची आलबेल झाली.दुसऱ्या दिवसाला पुतणी चतुर्भुज होणार यासाठी सातत्याने धावपळ करणारा काका वधू मंडपी नाही.हे नैराश्य कायम असतांना हा लग्न सोहळा निवडक पाहुण्यात आटोपता घेतला.पुतणी सासरी जाण्याच्या मंगलमय प्रसंगी काही वेळातच दुसरा धक्कादायक निरोप धडकला तो सरांचा मृत्यू झाल्याचा. आनंदाक्षणी हंबरडे फुटले.सर्वांच्या डोळ्यातील अश्रू आपल्या वेदनेला मोकळे करीत असतांना सायंकाळी पाच वाजता खैरी येथील मूळ गावातून काकाची प्रेतयात्रा निघाली.

या धीरगंभीर घटनेने पुतनीच्या चतुर्भुज प्रसंगी सर्वांच्याच मनाची कालवाकालव झाली.पुतनी पूनम चतुर्भुज होणार च्या पूर्वसंध्येला नियतीने डाव साधून मनमिळाऊ जवादे सरांना हिरावल्याने चिंचमंडळ सह दापोरा व खैरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई , वडील , पत्नी , दोन मुले , दोन भाऊ असा आप्तपरीवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies