पहापळ शाळेचे चार विद्यार्थी जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र
🔸सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
तालुकास्तरीय महादीप चाचणी मध्ये अंतिम फेरीत तालुक्यातील पहापळ येथील जिल्हा परिषद व.प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेतील चार विद्यार्थी जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
त्यात रोहित राजू मोहिततकर ,कु.समीक्षा महेश मोहिततकर कु. मृणाली प्रवीण वाढई व कु.नंदिनी दिनकर ठेंगणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र झालेले आहे.
सर्व विद्यार्थी अतिशय परिश्रम घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री अनिलजी राऊत मुख्याध्यापक श्री एन. टी.चौधरी सर ,शिक्षक श्री संजय फुलबांधे ,श्री अमर पुनवटकर,सौ. वाघमारे मॅडम व सौ गोंडे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोल गुरनुले यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या.