वेगाव येथील कबड्डी सामन्याचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
🔸श्रीराम क्रीडा मंडळ पुणे पुरुषामध्ये प्रथम
🔸रेणुका क्रीडा मंडळ अंजनी महिलामध्ये प्रथम
कोरोना नंतर प्रथमच वेगाव येथे जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब द्वारे विदर्भ स्तरीय कबड्डीचे सामने घेण्यात आले या मध्ये पुरुष व महिला गट मिळून ४५ मंडळानी सहभाग घेतला. दिवस रात चाललेय या कबड्डी सामन्या मध्ये जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब आणि त्यांचा स्वयंसेवकानी उत्कृष्ट कामगिरी बाजवली.तसेच प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणत पाहायला मिळाली.
पुरुष गटामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील चंडिका क्रीडा यांनी ३१०१६ रुपयाच्या द्वितीय बक्षीस पटकविले . स्वर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळ हे तृतीय बक्षीसाचे मानकरी ठरले यांना २१०१६ रुपयाचे बक्षीस प्रदान करण्यात आले तर चतुर्थ बक्षीस यवतमाळ येथील हनुमान व्यायाम शाळा यानी पटकवीले त्यांना मान्यवरांच्या हस्ते १००१६ रुपयाचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
महिला गटामध्ये द्वितीय बक्षीस १५०१६ श्रीराम बालक आखाडा बल्लारशहा तर तृतिय बक्षीस १००१६ सेवालाल देवठाना यांना देण्यात आले. तर चतुर्थ बक्षीस मित्र क्रीडा मंडळ पांढरकवडा यांनी पटकवीले त्यांना मान्यवरांच्या हस्ते ७०१६ रुपयाचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
या सामन्याचे बक्षीस वितरण कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये व आदि मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.