Type Here to Get Search Results !

उत्तमराव मनवर "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने सन्मानित

उत्तमराव मनवर "महाराष्ट्र रत्न" पुरस्काराने सन्मानित

दिग्रस :- प्रतिनिधी 
अत्यंत महत्त्वाचा व सन्मानाचा असा "महाराष्ट्र रत्न" पुरस्कार महाबोधी बहुउद्देशीय संस्थेतर्फे नुकताच चिंचोली येथील उत्तमराव मनवर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. नेर तालुक्यातील वटफळी -वटफळा येथे आयोजित तिसाव्या धम्मपरिषदेत प्रा. भदंत सुमेधबोधी महाथेरो वटफळी, भदंत नागघोष पुणे, भदंत राहूल आणि आचार्य धम्मदीप यांचे हस्ते "महाराष्ट्र रत्न" पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

उत्तम केशवराव मनवर यांना विद्यार्थी जीवनापासूनच समाजसेवा व धम्मकार्याची आवड आहे. त्यांचं एम.ए. डी. एड. एवढं शिक्षण झालेलं आहे. ते १९८६ पासून निस्वार्थपणे अविरत समाजसेवा करीत आहेत. सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग करून भरीव कामगिरी मनवर करत आलेले आहेत. या कामाची दखल घेत त्यांना आजवर "धम्मभूषण", "हरितदूत", पंचायत समिती दिग्रसचा "उत्कृष्ट शिक्षक" व स्व. ईश्वर देशमुख प्रतिष्ठानचा "आदर्श शिक्षक" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शासन तथा विविध संस्था, संघटना तसेच प्रतिष्ठानतर्फे त्यांना अनेक पुरस्कार तथा प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आलेले आहे.

महाबोधी बहुउद्देशीय संस्था, अमरावती शाखा वटफळी वटफळा ता. नेर ही संस्था गेली तीस-पस्तीस वर्षापासून मानवकल्याण साधण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेल्या विज्ञाननिष्ठ धम्माचं कार्य करीत आहे. धम्म संरक्षण, धम्म संवर्धन व मानवकल्याण हाच मूळ उद्देश बाळगून कार्य करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies