बारावीच्या परीक्षार्थींना शालेय साहित्याचे वाटप
आ. संजय राठोड यांच्या पुढाकार
दिग्रस :- प्रतिनिधी
बारावीची परीक्षा शुक्रवारी , दि.४ मार्च २०२२ रोजी असल्याने माजी वन मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बारावीच्या परीक्षार्थींना उत्तमपणे त्यांना परीक्षा सोपी जावी त्यासाठी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम सरावासाठी योग्य दिशा मिळावी या उदात्त सामाजिक हेतूने दहावी व बारावी बोर्ड परिक्षेकरिता मोफत ऑनलाइन सराव संच इंग्रजी, मराठी व सेमी माध्यमांसाठी पुण्यातील शिक्षकांशी थेट वैयक्तिक संवाद साधण्यासाठी विनामूल्य हेल्पलाईन सेवा,पुण्यातील अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी वेबिनार मध्ये विनामूल्य प्रवेश देण्यासाठी आयोजक मास्टर माइंड दारव्हा- दिग्रस - नेर विधानसभा सदस्य आमदार संजय राठोड यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. तसेच त्यांनी दि.४ मार्च रोजी असलेल्या बारावीच्या परीक्षार्थींना एक बॉटल व पेपर सोडविण्यासाठी पारदर्शक उत्कृष्ट असलेले पेपर पॅड दिग्रस तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्य देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
दिग्रस तालुक्यातील कळसा व चिंचोली येथे आमदार संजय राठोड यांच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वात तेथील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी एक पेपर पॅड व पाणी बॉटल देऊन शुभेच्छा दिल्या. या अभिनव उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, सरपंच हरीश मनवर, मोतीराम खेकाळे, सुनील कांबळे, पोलीस पाटील नरेंद्र शिंदे, अशोक जाधव, संतोष सावरकर, निखिल खुळे, दत्ता जाधव,गोवर्धन भागवत,गोपाल शिंदे,सुनील नाटकर, शिरू शिंदे, किशोर कांबळे, प्रभू चव्हाण,वसंता चव्हाण,वर्षा ढाले आदींनी अथक परिश्रम घेतले.