Type Here to Get Search Results !

कवी जय राठोड यांना 'साहित्य गौरव सन्मान-२०२२' प्रदान

कवी जय राठोड यांना 'साहित्य गौरव सन्मान-२०२२' प्रदान

राष्ट्रीय कवी संमेलनात नोंदविला आपला सहभाग
दिग्रस:- प्रतिनिधी
येथील सुप्रसिद्ध युवा कवी जय प्रकाश राठोड यांना जागतिक कविता दिवसाच्या पर्वावर शांती फाउंडेशन, गोंडा, उत्तर प्रदेश या राष्ट्रीय संस्थेतर्फे 'साहित्य गौरव सन्मान-२०२२' देऊन सन्मानित करण्यात आले. शांती फाउंडेशनतर्फे जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून 'राष्ट्रीय कवी संमेलन' आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये कवी जय राठोड यांनी आपला सहभाग नोंदविला. त्यांच्या कवितेने याप्रसंगी वाहवा मिळवून 'साहित्य गौरव सन्माना'वर आपली मोहोर उमटवली.

'नव्या उमेदीचे नवे कवी' म्हणून कवी जय राठोड यांच्याकडे पाहिले जाते. ते उत्कृष्ट लेखक, गझलकार तथा पत्रकार देखील आहेत. आजवर त्यांनी विविध ज्वलंत मुद्यांना हात घालून लिखाण केले आहे. आतड्याला पीळ पाडणारी त्यांची लिखाणशैली असल्याने साहजिकच वाचकांना भावते. किशोराअवस्थेपासूनच त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले आहे. अठरा वर्षांपासून सतत साहित्य सेवा करत असल्याने त्यांना आजवर साहित्य क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत, हे विशेष...!

गोंडा, उत्तर प्रदेश येथील शांती फाउंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय कवी संमेलन गुगल मीटवर पार पडले. यामध्ये भारतभरातील विविध राज्यातून उत्कृष्ट कवींनी आपापली कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ.विजयकुमार शाह उपस्थित होते. आयोजक तथा शांती फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती पिंकीदेवी, सचिव गयाप्रसाद आनंद, संस्थापक शिवप्रसादजी व संयोजक सुनीलकुमार आनंद यांच्याद्वारे सहभागी कवींना 'साहित्य गौरव सन्मान' देऊन गौरविण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies