Type Here to Get Search Results !

आरंभी येथे दारूच्या बाटलांची केली 'होळी'

आरंभी येथे दारूच्या बाटलांची केली 'होळी'

जागरूक युवकांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश




दिग्रस:- प्रतिनिधी
तालुक्यातील आरंभी येथील काही जागरूक युवकांनी होळी सणाच्या पावन पर्वावर एकत्रित येऊन दारूच्या रिकाम्या बाटलांची होळी करून अफलातून होळी सण साजरा केला. समाजाने दारूच्या व्यसनाला मूठमाती देऊन आरोग्यसंपन्न जीवन व्यतीत करावे, हा संदेश समाजात पसरावा, म्हणून या युवकांनी पुढाकार घेतला. आपल्या अभिनव कृतीतून असा संदेश दिल्यामुळे या युवकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

होळी सण आनंदाचा महापर्व असतो. मात्र होळीला व्यसनाचे झालर चढविले जाते. मद्यपानाचे व्यसन हे आज अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. बहुतांश युवकपिढी आज मद्यपानाच्या जाळ्यात अडकली आहेत. किशोरवयीन मुले देखील या व्यसनाला जवळ करताना दिसून येते. सुरुवातीला मजा म्हणून दारू प्यायली जाते.मात्र नंतर दारू हीच प्राथमिकता होते आणि हळूहळू दारूच्या आहारी माणूस जाऊ लागतो. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. घरदार उध्वस्त झाले आहेत. अनेक जण देशोधडीला लागले आहेत.

निव्वळ दारूच्या व्यसनमुक्तीचा संदेश समाजात पसरवा. सोबतच दारूच्या व्यसनापासून लोकांनी अलिप्त राहावे, यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जय राठोड, सुधीर राठोड, नरेंद्र चव्हाण, नितेश चव्हाण, काळू राठोड, नामदेव जाधव, पद्माकर राठोड, योगेंद्र बोडखे, अतुल राठोड, राजकुमार राठोड यावेळी उपस्थित होते.


दरवर्षी केली जाते दारूची 'होळी'
दरवर्षी पुढाकार घेऊन हे युवक रिकाम्या बाटलांची होळी जाळून हा सण साजरा करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम थांबला होता. मात्र यावर्षी त्यांनी हा उपक्रम राबविला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies