जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
झरीजामणी औ. प्र. संस्थेचा पुढाकार झरी : प्रतिनिधी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था झरीजामनी येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन प्रबोधन सत्रांसोबतच मुलींसाठी रांगोळी स्पर्धा, बुके स्पर्धा, वक्तृत्व , संगीत खुर्ची, डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या प्रबोधन सत्रामध्ये मा. संगिता हेलोंडे,ठाणेदार , पाटण या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिला संरक्षण व आत्मरक्षण या विषयावर, मुलींना मार्गदर्शन केले. कु.भाग्यश्री क्षिरसागर यांनी थोर महिलांविषयी पाॅवर पाॅईंट सादरीकरण केले.

दुसऱ्या प्रबोधन सत्रामध्ये मा. भुषण वाढई,न्यायाधीश, दिवाणी न्यायालय झरीजामनी व अधिवक्ता गण उपस्थित होते. महिलांविषयी विविध कायद्यांवर मा. न्यायाधीश महोदय, अॅड. काटकर, अॅड ठाकूर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
संस्थेतील मुलींकरीता कर्मचारी वर्गाकडून स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य संजय तेलतुमडे यांचे मार्गदर्शनात सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.